U Mumba vs Dabang Delhi saam tv news
Sports

Pro Kabaddi Season 10: यु मुंबाचं नेमकं चुकतय तरी कुठं? घरच्या मैदानावर दबंग दिल्लीकडून दारुण पराभव

U Mumba vs Dabang Delhi: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात यु मुंबा आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

PKL Season 10, U Mumba vs Dabang Delhi:

घरच्या मैदानावर यु मुंबाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात यु मुंबा आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्लीने यु मुंबावर ४०-३४ ने विजय मिळवला आहे. या सामन्यात १३ गुणांची कमाई करणारा आशू मलिक दिल्लीच्या विजयाचा शिलेदार ठरला आहे.

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत सुरुवातीला दबंग दिल्लीचा कर्णधार आणि स्टार रेडर आशू मलिकने ८ गुणांची कमाई करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. दिल्लीने मुंबा संघावर पहिला लोन चढवला व सामन्यात १३-८ अशी आघाडी घेतली.

या सामन्यात पिछाडीवर असलेल्या यु मुंबा संघाने जोरदार कमबॅक केले. आमीरमोहंमद जाफर दानिश, गुमान सिंग आणि जय भगवान यांनी सुरेख खेळ करत १५ गुणांची कमाई करताना आघाडी कमी केली. पूर्वार्ध संपण्यास एक मिनिटाची वेळ शिल्लक असताना दबंग दिल्ली संघ २०-१८ अशा फरकाने आघाडीवर होता. (Latest sports updates)

मध्यांतराच्या सुरुवातीलाच दबंग दिल्ली संघावर यु मुंबा संघावर पहिला लोन चढवला व सामन्यात २२-२२ अशी बरोबरी साधली. दिल्लीच्या आशू मलिकने, तर मुंबाच्या जाफर दानिशने सुपर १० पुर्ण केले. सामन्यातील २५ व्या मिनिटाला मुंबा संघ दोन गुणांच्या फरकाने आघडीवर होता.

सामना सामना स्थितीत असताना दिल्लीच्या आशू मलिकने उत्कृष्ट कामगिरी करत यु मुंबा संघाला ऑल आऊट केले व पाच गुणांची कमाई करताना संघाला ३६-३१ अशी स्थिती निर्माण करून दिली. सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना दबंग दिल्ली संघ चार गुणांच्या फरकाने आघाडीवर होता. सामन्याच्या शेवट पर्यंत आपली आघाडी कायम ठेवत दबंग दिल्ली संघाने यु मुंबा संघावर सहा गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT