pro kabaddi 2024 saam tv news
क्रीडा

PKL Season 10: पवनला रोखण्यात बंगालला यश! वैभव - शुभमच्या डिफेन्सच्या बळावर बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर विजय

Pro Kabaddi Season 10: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि तेलुगू टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते

Ankush Dhavre

Bengal Warriors vs Telugu Titans:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि तेलुगू टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात बंगालचा वैभव गरजे तेलुगू टायटन्सवर चांगलाच गरजला. त्याच्या मजबूत बचावाच्या जोरावर बंगालने तेलुगूवर ४६-२६ असा वन साईड विजय मिळवला.

एनएससीआय स्टेडियम झालल्या या लढतीत खरे तर बंगाल वॉरियर्स संघ कर्णधार व अव्वल आक्रमक मनिंदरशिवाय मैदानात उतरला. मात्र त्याच्या जागी खेळणाऱ्या नितीन कुमारने वेगवान चढायानी टायटन्सला झुंजवले. आजचा कर्णधार शुभम आणि वैभव यांच्या कामगिरी मुळे सात मिनिटात टायटन्सवर पहिला लोन चढवून वॉरियर्स संघाने १०-४ अशी आघाडी घेतली.

वैभवने टायटन्सचा कर्णधार पवनला पेचात पकडून आपला सहावा पकडीचा गुण मिळवलं त्यामूळे मध्यंतरास टायटन्स वर दुसरा लोन चढवून वॉरियर्स संघाने २७-१० अशी आघाडी घेतली. (Kabaddi News In Marathi)

उत्तरार्धात टायटन्स संघाने पुनरागमनाचा जोरदार प्रयत्न केला. ३३ व्या मिनिटाला पवनने एकाच चढाईत शुभम व आदित्यला बाद केल्यामुळे तेलगू टायटन्सने वॉरियर्स वर पहिला लोन चढवून आपली पिछाडी २४-३३ अशी कमी केली. मात्र नितीनने संदीप व मोहित यांना एकाच चढाईत बाद केल्याने वॉरियर्स ला टायटन्स वर तिसरा लोन चढवता आला.

केवळ दोन मिनिटे बाकी असताना शुभमने पवन आणि रॉबिन चौधरी च्या पकडी करून आपल्या पाचव्या गुणाची आणि संघाच्या चौथ्या विजयाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT