राहुल चौधरी हा प्रो कबड्डी स्पर्धेतील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने गतवर्षी झालेल्या स्पर्धेत जयपूर पिंक पँथंर्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आगामी २०२३ स्पर्धेसाठी मुंबईत ऑक्शन सुरू आहे.
दरम्यान या ऑक्शनमध्ये राहुल चौधरी अनसोल्ड राहिला आहे. १० व्या हंगामासाठी त्याला एकही खरीददार मिळालेला नाही.
राहुल चौधरीच्या गेल्या हंगामातील कामगिरीबाबत बोलायचं झालं तर त्याने २१ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ७३ गुणांची कमाई केली होती. यादरम्यान ७१ गुण चढाई करताना तर २ गुण बचाव करताना कमावले होते. चढाई करताना त्याने सुपर १० देखील पुर्ण केला होता. या हंगामानंतर जयपूर पिंक पँथर्सने त्याला रिलीज केलं होतं.
ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी त्याला एकही खरीरदार मिळाला नाही. या ऑक्शनमध्ये त्याची बेस प्राईज १३ लाख रूपये इतकी होती.
हे खेळाडू राहिले अनसोल्ड..
राहुल चौधरीसह अनेक दिग्गज खेळाडू प्रो कबड्डीच्या लिलावात अनसोल्ड राहिले आहेत. राहुल चौधरीसह दीपक हुड्डा,संदीप नरवाल, विशाल भारद्वाज, बलदेव सिंग, संदीप कंडोला, मोनू गोयत, प्रशांत कुमार राय, रोहित कुमार आणि रिशांक देवाडिगा अनसोल्ड राहिले आहेत.
यापैकी काही खेळाडूंना पुन्हा संधी मिळू शकते. मात्र हे खेळाडू जर बाहेर झाले तर, प्रो कबड्डीच्या एका युगाचा अंत झालाय असं म्हणंण वावगं ठरणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.