puneri paltan twitter
क्रीडा

PKL 2024: प्रो कबड्डी स्पर्धेची तारीख ठरली! या 3 शहरात रंगणार सामने

PKL 2024 Date And Venue: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाची तारीख ठरली आहे. दरम्यान हे सामने कुठे रंगणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Pro Kabaddi 2024 Date And Venue: प्रो कबड्डी लीग(पीकेएल)च्या ११व्या मौसमास १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. याआधीच्या पर्वात प्रो कबड्डी लीगने यशस्वीरीत्या आपली दहा वर्षे पूर्ण केली. जागतिक स्तरावर अल्पावधीतच महत्वाचे स्थान मिळवलेल्या प्रो कबड्डी लीगने आपल्या नव्या मौसमाची सुरुवात ऑक्टोबरपासून करणार आहे.

या नव्या मोसमामध्ये प्रो कबड्डी लीग स्पर्धा पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. २०२४च्या मालिकेस हैद्राबाद येथील गच्चीबाउली स्टेडियम येथे १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून त्यानंतर या लीगचा दुसरा टप्पा नोएडा येथील नोएडा इंडोर स्टेडियम येथे १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

तर, तिसरा टप्पा पुणे येथे बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम या ठिकाणी 3 डिसेंबर 2024पासून रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्ले ऑफच्या तारखा व ठिकाण यानंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

पीकेएलच्या ११व्या हंगामाच्या तारखांची घोषणा करताना प्रो कबड्डी लीगचे संचालक अनुपम गोस्वामी म्हणाले, पीकेएलच्या ११व्या हंगामाच्या कार्यक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. लीगचा १०वा हंगाम यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता नवा ११ वा हंगाम त्याहून अधिक लोकप्रिय होईल. यामुळे भारत आणि जगभरातील कबड्डीच्या वाढीला बळकटी मिळेल.

काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा मुंबईत पार पडला. यामध्ये आठ खेळाडूंना एक कोटीहून अधिक रक्कम मिळाली.

मशाल स्पोर्ट्स आणि डिस्ने स्टार यांनी पीकेएलला भारतातील सर्वात यशस्वी लीग बनवले आहे. मशालने भारतीय हौशी कबड्डी महासंघाशी करार केल्यानंतर कबड्डी या भारतातील स्वदेशी खेळाची आणि खेळाडूंची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलली आहे. पीकेएलमधील खेळाडूंचा सहभाग पाहिल्यानंतर अनेक कबड्डी खेळणाऱ्या राष्ट्रांनी त्यांच्या देशांतर्गत कार्यक्रमालाही अधिक आकर्षक केले आहे.

प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरून केले जाणार आहे. त्याचबरोबर डिस्ने+ हॉटस्टरवरही प्रसारित केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

SCROLL FOR NEXT