pro kabaddi 
Sports

PKL 2024 Final: प्रो कबड्डी फायनलची तारीख अन् ठिकाण ठरलं! या दिवशी रंगणार थरार

Pro Kabaddi Final Venue And Date: प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेची फायनल पुण्यात होणार आहे.

Ankush Dhavre

Pro Kabaddi 2024 Final: प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ११व्या पर्वातील प्ले ऑफ आणि अंतिम लढत पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. हे सामने २६ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. संयोजकांच्या वतीने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही घोषणा करण्यात आली.

लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघ २६ डिसेंबर रोजी एलिमिनेटर सामन्यासाठी आमनेसामने येतील. तिसऱ्या क्रमांकावर येणारा संघ एलिमिनेटर १ मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. चौथ्या स्थानावरील संघ पाचव्या स्थानावरील संघाशी एलिमिनेटर २ मध्ये खेळेल.

एलिमिनेटर १चा विजेता उपांत्य फेरीत गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाशी खेळेल. एलिमिनेटर २ चा विजेता दुसऱ्या उपांत्य फेरीत गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानावरील संघाशी खेळेल. या दोन्ही उपांत्य लढती २७ डिसेंबर रोजी खेळल्या जातील. त्यानंतर ११व्या पर्वाची अंतिम लढत २९ डिसेंबर रोजी होईल.

लीगचा दुसरा टप्पा सध्या नोएडा येथे सुरु आहे. हा टप्पा १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान अखेरचा टप्पा पुण्यातच खेळविला जाणार आहे. त्यानंतर प्ले ऑफ लढती होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT