Prithvi Shaw Sapna Gill Case Latest VIDEO: भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादांमुळे जास्त चर्चेत असतो. भारतीय संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉ हा सपना गिलसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. ४ महिने उलटूनही हा वाद थांबायचं नाव घेत नाहीये.
दरम्यान आता सपना गिल सोबतच्या वादाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सपना गिल आणि तिचा मित्र शोभित ठाकूर यांच्या वतीने वकील अली काशिफ खान यांनी न्यायालयात सादर केला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, शोभित ठाकूर सेल्फी काढण्यासाठी पृथ्वी शॉकडे जातो.
त्यावेळी सपना गिल ही सोफ्यावर बसून असल्याचे दिसून येत आहे. सेल्फी घेत असताना शोभित आणि पृथ्वी शॉ यांच्यात जोरदार वाजतं. हा वाद मारामारीपर्यंत पोहोचतो.
एकिकडे पृथ्वी शॉचे मित्र त्याला थांबण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे शोभितचे मित्र शोभितला थांबवण्यासाठी शोभितचे मित्र मध्ये पडतात. आपल्या मित्राचं भांडण सुरु आहे हे पाहून, सपना गिल देखील मध्ये पडते.
क्लबच्या आत सुरु असलेला वाद हा क्लबच्या बाहेर जाऊन पोहोचतो. त्यानंतर पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
तर झाले असे होते की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पृथ्वी शॉ आणि सोशल मिडीया इन्फ्लूएंसर सपना गिल यांच्यात वाद झाला होता. सपनाने पृथ्वी शॉवर छेड काढण्याचा आणि मारहाण करण्याचा आरोप केला होता.
त्यावेळी FIR देखील करण्यात आली होती. हे प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचले होते. पण, याप्रकरणी पोलिसांचे मोठे वक्तव्य नुकतेच समोर आले आहे. पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाला म्हटले आहे की, सपना गिलवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest sports updates)
दोघांनी एकमेकांवर आरोप करत तक्रार दाखल केली होती. या दोघांचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले होते. तेव्हा सपनाने असा दावा केला होता की, पृथ्वी शॉ विरोधात कुठलीच तक्रार करण्यात आली नव्हती.
त्यामुळे तिने न्यायालयाची वाट धरली होती. सपना गिलने बॅटने मारण्यासह आणि विनयभंगासह काही प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम ३५४, ५०९,३२४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
सपनाने ही तक्रार दाखल करताना सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले होते. ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.