Prithvi Shaw-Sapna Gill Selfie Controversy Saam TV
Sports

Prithvi Shaw Controversy: सेल्फी प्रकरणात पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टाने 11 जणांना पाठवली नोटीस

Selfie Controversy Case : हायकोर्टाने ज्यांना नोटीस पाठवल्या आहेत त्यामध्ये दिल्ली पोलिसातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Priya More

Mumbai News: सोशल मीडिया (Social Media) स्टार सपना गिलसोबतच्या (Sapna Gill) सेल्फी वाद प्रकरणात पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होत चालली आहे आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने पृथ्वी शॉसह (Prithvi Shaw) 11 जणांना नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने ज्यांना नोटीस पाठवल्या आहेत त्यामध्ये दिल्ली पोलिसातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आपले कर्तव्य व्यवस्थित न बजावल्याने हायकोर्टाने (Mumbai High Court) या पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

सपना गिलच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरबाबत हायकोर्टाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली आहे. सपना गिल आणि तिच्या मित्रांनी पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आणि त्याच्याशी भांडण केल्याचा आरोप केला आहे. सपना गिलने तिच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये तिने पृथ्वी शॉवर विनयभंग आणि बॅटने मारहाण केल्याचा आरोप केला होता. याच याचिकेच्या आधारे मुंबई हायकोर्टाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पृथ्वी शॉ 15 फेब्रुवारी रोजी आपल्या मित्रांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. तिथे त्याचा सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत वाद झाला. पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यातील भांडणाचा व्हिडिओही समोर आला होता. त्यानंतर पृथ्वी शॉच्या वकिलाच्यावतीने सांगण्यात आले होते की, 'सपनाला पृथ्वी शॉसोबत सेल्फी घ्यायचा होता. पृथ्वीने सेल्फी देण्यास नकार दिला. त्याने तो आपल्या मित्रांसोबत जेवायला आलो असल्याचे सांगितले. यानंतरच या वादाला सुरुवात झाली होती.'

या वादानंतर पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने दिलेल्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. सपना गिलनेही पृथ्वी शॉवर अनेक आरोप केलेत. सपनाने देखील पृथ्वी आणि त्याच्या मित्रांविरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पृथ्वी आणि त्याच्या मित्रांविरोधात आयपीसीच्या कलम ३४, १२० बी, १४६, १४८, १४९, ३२३, ३२४, ३५१, ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा वाद झाला त्यावेळी पृथ्वी शॉ हा दारुच्या नशेमध्ये होता, असा आरोप देखील सपना गिलने केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पृथ्वी आणि सपना यांच्यामध्ये झालेल्या या वादाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. अशामध्ये या वादामुळे सपना गिलला खूपच चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

SCROLL FOR NEXT