GT vs PBKS Highlights : गुजरातसाठी राहुल तेवतिया ठरला संकटमोचक! थरारक सामन्यात पंजाबचा पराभव

GT vs PBKS Match : शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर ६ विकेट्सने विजय मिळवला.
GT vs PBKS Highlights
GT vs PBKS HighlightsSaam TV

GT vs PBKS Highlights : आयपीएलमध्ये आज मोहालीच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात थरारक सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर ६ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने गुजरासमोर विजयासाठी १५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात दमदार झाली. पावरप्लेमध्ये सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिलने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ४.४ षटकात ४८ धावांची भागीदारी केली.

GT vs PBKS Highlights
ICC T20I Rankings: तो अजूनही 'SKY'च! खराब फॉर्मात असूनही सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

वृद्धिमान साहा ३० धावांवर असताना बाद झाला. त्याला रबाडाने बाद केलं. त्यानंतर शुभमन गिलने साई सुदर्शनच्या साथीने गुजरातचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असताना अर्शदीपने साई सुदर्शनला बाद केलं. साई सुदर्शनने १९ धावा केल्या. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्या ८ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर डेव्हिड मिलरच्या साथीने शुभमन गिलने धडाकेबाज खेळी केली. शुभमनने ४९ चेंडूत ६७ धावा ठोकल्या. आपल्या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार खेचला. अखेरच्या षटकात गुजरातला ७ धावांची गरज असताना सॅम करनने सामन्यात रंगत आणली. त्याने शुभमन गिलला बाद केलं. (Maharashtra Breaking News)

सॅम करनच्या घातक गोलंदाजीने एकवेळ हा सामना गुजरातच्या हातातून निसटणार असं वाटत होतं. मात्र, २ चेंडूत गुजरातला ४ धावांची गरज असताना राहुल तेवतिया फलंदाजीसाठी आला. त्याने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामातील गुजरातचा हा चौथा विजय आहे.

तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. मोहमद शमीने प्रभसिमरनला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवले. त्यानंतर फॉर्मात असेलला शिखर धवनही लवकरच बाद झाला. शिखर धवनला जोशवा लिटल याने आठ धावांवर बाद केले.

मॅथ्यू शॉर्ट आणि भानुका राजपक्षे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने ही जोडी फोडली. राशिद खान याने मॅथ्यू शॉर्ट याला ३६ धावांवर बाद केले. मॅथ्यू शॉर्टने २४ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि एक षटकार लगावला.

मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यानंतर युवा जितेश शर्मा याने भानुका राजपक्षे याच्यासोबत पंजाबच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण मोहित शऱ्मा याने जितेश शर्मा याला बाद करत ही जोडी फोडली. जितेश शर्माने २५ तर राजपक्षेने २० धावा केल्या. अखेरच्या काही षटकात सॅम कररने फटकेबाजी करत पंजाबला १५० धावांचा टप्पा गाठून दिला. (Latest Sports Updates)

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com