USA vs Canada twitter
Sports

USA vs Canada:कॅनडा विरुद्ध अमेरिका सामन्यात खेळाडूंचा हिंदी भाषेत मजेशीर संवाद ,Video व्हायरल

USA vs Canada, Players Hindi Conversation: अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेचे खेळाडू हिंदीत संवाद साधताना दिसून आले.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात यजमान अमेरिकेने कॅनडाचा चांगलाच पाहुणचार केला. १९५ धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने १७.४ षटकात आव्हान पूर्ण केलं आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा सामना कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये सुरू होता. मात्र खेळाडू इंग्रजी नव्हे तर हिंदी भाषेत संवाद साधताना दिसून आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की , अमेरिकेला गोलंदाज हरमीत सिंग गोलंदाजी करतोय. तर कर्णधार मोनांक पटेल त्याच्याशी हिंदी भाषेत संवाद साधताना दिसून येत आहे. अमेरिका संघात भारतीय मुळचे खेळाडू आहेत. त्यामुळे ते हिंदीत संवाद साधतात. या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कॅनडाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने २० षटकअखेर ५ गडी बाद १९४ धावा केल्या. कॅनडाकडून फलंदाजी करताना नवनीत धालीवालने ४४ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६१ धावा चोपल्या.

अमेरिकेला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आरोन जोन्स विक्रमी १० षटकार खेचत नाबाद ९४ धावांची खेळी केली. तर गौसने ६५ धावांचे योगदान दिले. हा सामना अमेरिकेने ७ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

SCROLL FOR NEXT