एअर कॅनडाच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशानं दुबईसाठी उड्डाण करण्यापूर्वी विमानातून उडी मारली, अशी माहिती न्युयॉर्कमधील माध्यमांनी दिलीय. त्यामुळं क्रू मेंबर्सची पळापळ झाली. एअर कॅनडाच्या फ्लाईटमध्ये नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेवू या. ही घटना ८ जानेवारी रोजी घडली आहे. (latest marathi news)
टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (AIR CANADA) हा प्रवासी सामान्यपणे विमानात चढला, परंतु नंतर त्याच्या सीटवर बसण्याऐवजी केबिनचा दरवाजा उघडला गेला, आणि तो विमानातून खाली पडला. या घटनेनंतर तो २० फुट डांबरी खाली पडला, त्यामुळं गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तात्काळ पील प्रादेशिक पोलीस आणि इतर आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. एअर कॅनडानं दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळं बोईंग ७४७ च्या टेकऑफमध्ये सुमारे सहा तासांचा विलंब झाला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रकरणाची चौकशी सुरू
यासंबंधी एअरलाइनच्या प्रवक्त्यानं माध्यमांना सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्व बोर्डिंग आणि केबिन ऑपरेटिंग प्रक्रियांचे पालन केलं गेलं होतं. ग्रेटर टोरंटो विमानतळ (Canada) प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, हे संस्थेला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही एअरलाइन, पील प्रादेशिक पोलीस आणि पील ईएमएस सोबत मदत पुरवली.
त्याला (passanger) किती दुखापत झालीय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच प्रवाशाला त्याच्या या विस्कळीत वर्तनासाठी अटक करण्यात आली आहे की नाही, हे देखील अद्याप अस्पष्ट आहे.
यापूर्वीची घटना
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एअर कॅनडाच्या (air canada) विमानात एका 16 वर्षीय प्रवाशाने कुटुंबातील सदस्यावर हल्ला केला होता. त्यावेळी देखील दोन ते तीन तास उशीर झाला होता. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी जारी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा एअर कॅनडाचे फ्लाइट १३७ टोरंटोहून कॅल्गरीकडे जात होतें. विनिपेग रिचर्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:२० वाजता विमान विनिपेगकडे वळवल्याबद्दल सूचित करण्यात आलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "बोर्डवरील एका अनियंत्रित प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला मारहाण केल्याची माहिती त्यावेळी पोलिसांनी (Canada) दिली होती.
मारहाण करणाऱ्या या 16 वर्षीय तरुणाला सहप्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी रोखलं होतं. या तरूणाच्या कुटुंबातील सदस्यावर विमान प्रवासादरम्यान झालेल्या किरकोळ शारीरिक दुखापतीसाठी उपचार केले होते. तर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यांना इतर कोणतीही दुखापत झाली नव्हती. हल्ल्यामागील हेतू अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.