Dabang Delhi KC vs Jaipur Pink Panthers saam tv news
Sports

PKL Season 10: शेवटच्या मिनिटापर्यंत गेलेला जयपूर - दिल्ली सामना टाय; दिग्गज खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त

Dabang Delhi KC vs Jaipur Pink Panthers: प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामातील ४३ वा सामना दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

Pro Kabaddi League, Dabang Delhi KC vs Jaipur Pink Panthers:

प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामातील ४३ वा सामना दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान हा सामना ३२-३२ च्या बरोबरीत समाप्त झाला आहे. या सामन्यादरम्यान दबंग दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार नवीन कुमार ( naveen kumar) गंभीर दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, जयपूर पिंक पँथर्स संघाकडून अर्जुन देशावालने चढाई करताना सर्वाधिक १२ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना अंकुशने हाय फाय पूर्ण करत ७ गुणांची कमाई केली. तर दबंग दिल्ली संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, चढाई करताना आशू मलिकने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना विशाल भारद्वाज आणि मोहितने प्रत्येकी ३-३ गुणांची कमाई केली. (Latest sports updates)

या सामन्यात दबंग दिल्लीने सुरवातीपासूनच जयपूर पिंक पँथर्स संघावर आघाडी घेत दबदबा बनवून ठेवला होता. दिल्लीने जयपुरला आठव्या मिनिटाला ऑल आऊट केलं. यादरम्यान दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला.

दुसऱ्या डावात नवीन कुमारची कमतरता जाणवली . त्यामुळे संपूर्ण जबाबदारी आशू मलिकवर आली होती. याचा फायदा जयपूर पिंक पँथर्सने घेतला. अर्जुन देशवाल आणि अंकुश राठीच्या दमदार कामगिरीच्या बळावर दिल्लीचा संघ पहिल्यांदा ऑल आऊट झाला. अर्जुनने आपलं सुपर १० पूर्ण केलं. तर अंकुशने हाय फाय पूर्ण केलं. शेवटी हा सामना ३२-३२ च्या बरोबरीत समाप्त झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT