ms dhoni fan video twitter
Sports

MS Dhoni: 'मी तुला काहीच होऊ देणार नाही..' मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनला धोनीने काय आश्वासन दिलं?

Ms Dhoni Fan News In Marathi: मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनसोबत धोनीने काय संवाद साधला?

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करतोय. त्याला खेळताना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानावर हजेरी लावत असतात. आयपीएल २०२४ स्पर्धा ही धोनीची शेवटची स्पर्धा आहे,अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे त्याला शेवटचं खेळताना पाहण्यासाठी फॅन्स तुफान गर्दी करत होते. त्यावेळी एका फॅनने डेअरिंग केली, मैदानावर उडी मारली आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देत मैदानात जाऊन धोनीची भेट घेतली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात एका फॅनने मैदानात उडी घेत धोनीची भेट घेतली आणि त्याच्या पाया पडल्या. त्यावेळी धोनीने त्या फॅनच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्याशी संवाद केला. दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत फॅनने मोठा खुलासा केला आहे.

दोघांमध्ये काय चर्चा झाली?

मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनचं नाव जयकुमार जानी असं आहे. त्याने Focused इंडियन या युट्यूब चॅनेलवर मुलाखात दिली. या मुलाखतीत तो म्हणाला की, 'धोनी भाईने मला विचारलं की, तू इतक्या जोरजोरात श्नास का घेतोय? त्यावेळी मी त्यांना, मला काय त्रास होतोय हे सांगितलं. माझ्या नाकावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याआधी मला तुम्हाला भेटायचं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले की, शस्त्रक्रियेची काही काळजी करु नको, ते मी बघून घेईल. तुला काही होणार नाही, घाबरु नकोस. त्यांनी सुरक्षारक्षकांनाही सांगितलं की, याला काही त्रास देऊ नका.'

एमएस धोनीच्या फॅनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. आयपीएलचं हे हंगाम धोनीच्या आयपीएल हंगामातील शेवटचं हंगाम असू शकतं असं म्हटलं जात होतं. मात्र त्याने अजून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र तो पुढील हंगामात खेळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Godavari River Flood : गोदावरी नदीला पूर; गंगामसला गावात पुराचे पाणी, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली

Goa Vibes Mumbai : मुंबईत गोवा! गोराई बीचवर पांढरी वाळू, सीफूड आणि फेरी राइड One Day Tripचा अनुभव

सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Rain Live News: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

Shreya Bugde: सुंदरता काय असते? श्रेयाकडे पाहून कळेल

SCROLL FOR NEXT