phil salt with jonny bairstow saam tv
Sports

Phil Salt Record: 4,6,4,6,6,4..सॉल्टच्या वादळात विंडिजची धुळधाण! युवराजनंतर हा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच फलंदाज

Phil Salt Most Runs In Over Record: इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्टच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४२ व्या सामन्यात इंग्लंड आणि वेस्टइंडिज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडिजच्या गोलंदाजांची धु धु धूलाई करत ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १८० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने १७.३ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या विजयात फिल सॉल्टने ४७ चेंडूंचा सामना करत ८७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

फिल सॉल्टने या सामन्यात फलंदाजी करताना १७ व्या षटकात ३० चोपल्या. यासह तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत युवराज सिंगनंतर एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. युवराज सिंगने २००७ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत स्टूअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार खेचत ३६ धावा केल्या होत्या. फिल सॉल्टने रोमारियो शेफर्डच्या षटकात ३० धावा चोपल्या.

युवराज सिंग या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यासह जेहान मुबारक, डेविड हसी आणि एबी डिव्हिलियर्स या फलंदाजांचा देखील या यादीत समावेश आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

३६ धावा - युवराज सिंग विरुद्ध स्टूअर्ट ब्रॉड

३० धावा - फिल सॉल्ट विरुद्ध रोमारिया शेफर्ट, २०२४

२९ धावा- एबी डिव्हिलियर्स विरुद्ध राशिद खान, २०१६

२९ धावा- जेहान मुबारक विरुद्ध लेमेक ओनयांगो, २००७

२७ धावा - डेव्हिड हसी विरुद्ध मोहम्मद शमी, २०१०

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजने २० षटकअखेर १८० धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टने ४७ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने इंग्लंडला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

SCROLL FOR NEXT