Shreya Maskar
गगनगड किल्ला पश्चिम घाटात, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात आहे. तो सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेला आहे.
गगनगड किल्ला 12 व्या शतकात शिलाहार राजवंशाने बांधला आहे. ज्यावर नंतर यादव, आदिलशाही आणि मराठा शासकांनी राज्य केले.
गगनगिरी महाराजांच्या मठामुळे गगनगड किल्ला एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ बनला आहे. हिवाळ्यात येथे ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
गगनगड किल्ला ज्या गगनबावडा या गावात आहे, ते ठिकाण 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाते.
गगनगड किल्ला ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
गगनगड किल्ला प्रामुख्याने लष्करी संरक्षण आणि नियंत्रणासाठी, तसेच सह्याद्री पर्वतातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी बांधला गेला होता.
गगनबावडा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. फॅमिलीसोबत येथे आवर्जू जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.