pakistan saam tv
Sports

PCB: दुष्काळात तेरावा महिना.. Champions Trophyचं आयोजन अन् पाकिस्तानचं 7390000000 रुपयांचं नुकसान

Pakistan Cricket Board Loss After Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तान क्रिकेट बोर्डला तब्बल २९ वर्ष वाट पाहिल्यानंतर आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली होती. मात्र पीसीबीला या संधीचं सोनं करता आलं नाही. पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला.

पाकिस्तानने ही स्पर्धा भरवण्यासाठी कोटी रुपये खर्च केले होते. मात्र प्रॉफीट कमावण्याच्या नादात पाकिस्तानचा भलामोठा लॉस झाला आहे. ८६९ कोटी रुपये खर्च करुन पाकिस्तानला अवघ्या ५२ कोटींची कमाई करता आली. त्यामुळे पीसीबीला खेळाडूंच्या मानधनात कपात करावी लागली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद, म्हणजे पीसीबीसाठी पैसा कमवण्याची सुवर्णसंधी होती. मात्र पाकिस्तानने ही संधी हातून घालवली. पाकिस्तानने ही स्पर्धा भरवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च केला. स्टेडियमच्या नुतणीकरणासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी एकूण ८६९ कोटी रुपये खर्च केले.

मात्र पाकिस्तानचा संघ इतका खर्च करुन तोंडावर आपटला. ज्या स्टेडियमची ओपनिंग सेरेमनी झाली, त्या स्टेडियममध्ये पाकिस्तानला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली.पाकिस्तानला या स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नाही,यासह हा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला.

खेळाडूंच्या मानधनात कपात

पीसीबीने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात मोठी कपात केली आहे. त्यामुळे खेळाडू नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. या खेळाडूंच्या मानधनातून ९० टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात खेळाडूंसाठी एक मोठा धक्का आहे. पीसीबीवर सध्या आर्थिक संकट आहे. आता पीसीबी या संकटातून बाहेर कसं पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाकिस्तानात स्पर्धेचे आयोजन करण्याआधी अनेकांनी विरोधही केला होता. मात्र पीसीबी माघार घ्यायला तयार नव्हतं. भविष्यात पीसीबीला कुठल्याही स्पर्धेचे आयोजन करायचे असेल, तर त्याआधी आर्थिक बाबीही लक्षात घ्यायला हव्या, ही अद्दल पीसीबीला नक्कीच घडली असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT