पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत सॅम करन संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. आज (१८ एप्रिल) पंजाब किंग्ज संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे.
या सामन्यात शिखर धवन पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी शिखर धवनच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.
सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याची रिहॅब प्रोसेस सुरु आहे. सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 'शिखर धवन सध्या रिहॅब प्रोसेसमध्ये आहे.' मेडिकल टीमने आधी सांगितलं होतं की,तो कमीत कमी ७ ते १९ दिवस संघाबाहेर राहणार आहे.
आज मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याचं खेळणं कठीण दिसून येत आहे. त्याच्याऐवजी सॅम करन संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. शिखर धवनने मैदान सोडल्यानंतर सॅम करन संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. पंजाब किंग्ज संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने केवळ २ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते पंजाब संघाची प्लेइंग ११...
जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, लियाम लिविंगस्टन, सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, शशांक सिंग, हरप्रीत बराड़ आणि कगिसो रबाडा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.