आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५३ वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघ धरमशालेतील HPCA स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. पंजाब किंग्ज संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने १० पैकी ४ सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. तर १० पैकी ५ सामने जिंकणारा चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ २९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जने १५ सामने जिंकले आहेत. तर पंजाब किंग्जने १४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये चेन्नईचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. मात्र पंजाब किंग्ज संघाचा गेल्या काही सामन्यातील फॉर्म पाहता चेन्नईचा संघ पंजाबला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
हा सामना धरमशालेतील HPCA स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.मात्र अनेकदा या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे हाय स्कोरिंग सामना पहायला मिळू शकतो. तसेच नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज: अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), डॅरिल मिचेल, मोइन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकुर, महेश थिक्षणा, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना
चेन्नई सुपर किंग्ज संघातील इम्पॅक्ट प्लेअर्स: समीर रिजवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), राइली रूसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग.
पंजाब किंग्स इम्पॅक्ट प्लेअर: हरप्रीत सिंग, लियाम लिविंगस्टन, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, विधाथ कावेरप्पा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.