pat cummins saam tv
Sports

SRH vs RR, IPL 2024: मैदानाबाहेर असलेल्या या दिग्गजाचा 'मास्टरप्लान' राजस्थानवर पडला भारी; पॅट कमिन्सचा खुलासा

SRH vs RR, Qualifier 2: क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

कोलकाता नाईट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. या दोन्ही संघांमध्ये फायनलचा थरार येत्या २६ मे रोजी चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. तर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान या विजयाचं श्रेय पॅट कमिन्सने कोणाला दिलं जाणून घ्या.

या सामन्यात पॅट कमिन्सने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. त्याने मयांक मार्कंडेयच्या आधी शाहबाझ अहमदला गोलंदाजी दिली. हा निर्णय कोणाचा होता याबाबत पॅट कमिन्सने खुलासा केला.

पॅट कमिन्सने सामन्यानंतर म्हटले की, हा निर्णय डॅनियल विटोरीचा होता. या निर्णयामुळे हैदराबादने या सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. त्याने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली आणि २३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

पॅट कमिन्स म्हणाला की, ' राजस्थान रॉयल्सच्या संघात उजव्या हाताचे फलंदाज होते. त्यामुळे आम्हाला डावखुरा फिरकी गोलंदाज हवा होता. शाहबाझ अहमद आमच्यासाठी एक्स फॅक्टर ठरला.' यासह त्याने स्पष्ट केलं की, हा डॅनियल विटोरीचा प्लान होता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटक अखेर ९ गडी बाद १७५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला २० षटक अखेर ७ गडी बाद १३९ धावा करता आल्या. हा सामना राजस्थानला ३६ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

Maharashtra Live News Update: - जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT