parthiv patel twitter
Sports

IND vs ENG : इथेच टीम इंडियाचं चुकलं! पराभवानंतर टीम इंडियाने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Parthiv Patel On Team India Defeat: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर पार्थिव पटेलने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Parthiv Patel On Team India Defeat:

हैदराबाद कसोटीत इंग्लंडचं बॅझबॉल भारतीय संघावर भारी पडलं आहे. या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने दमदार खेळ केला.

मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव गडगडला. या पराभवासह भारतीय संघ या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने भारतीय संघाला चुक लक्षात आणून देत मोलाचा सल्ला दिला आहे.

पार्थिव पटेलने जियो सिनेमावर बोलताना म्हटले की,'या सामन्यात ३ फिरकी गोलंदाजांची गरज होती यात काहीच शंका नाही. मात्र माझे विचार जरा वेगळे आहेत. तुम्ही सिराजला या सामन्यात ६-७ षटकं गोलंदाजी दिली.

अक्षर पटेलला कुलदीप यादवच्या आधी संधी दिली. त्यांची फलंदाजी चांगली आहे, असं रोहितने सामन्यापूर्वीच सांगितलं होतं. जर गोलंदाजीत विविधता हवी होती तर तुम्ही कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला हवं होतं. तुम्ही सिराजच्या जागी एका फलंदाजाला संघात स्थान देऊ शकले असते. संघात अतिरिक्त फलंदाज असणं कधीही चांगलं असतं.'

या सामन्यातील पहिल्या डावात सिराजला केवळ ४ षटकं टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २८ धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या षटकात त्याने ७ षटकं टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २२ धावा खर्च केल्या. त्याने या सामन्यात १३ षटकं गोलंदाजी करत २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने ३३ धावा खर्च केल्या. (Latest sports updates)

या सामन्यात अक्षर पटेलने फलंदाजी करताना पहिल्या डावात ४४ तर दुसऱ्या डावात १७ धावांची खेळी केली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज होती. मात्र एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून मोठी खेळी करता आली नाही. या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT