Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? 'हे' ७ सोपे उपाय करतील प्रॉब्लेम दूर, केसही राहतील हेल्दी

Shruti Vilas Kadam

अँटी-डँड्रफ शॅम्पूचा वापर करा

झिंक पायरिथिओन, केटोकोनाझोल, सेलेनियम सल्फाइड किंवा सॅलिसिलिक अॅसिड असलेला अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरल्याने कोंडा नियंत्रित होण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

केस आणि टाळू स्वच्छ ठेवा

आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवा. टाळूवर तेल, घाम आणि धूळ साचल्यास कोंडा वाढू शकतो.

Hair Care | Saam Tv

टी ट्री ऑइलचा वापर करा

टी ट्री ऑइलमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. नारळाच्या तेलात २–३ थेंब टी ट्री ऑइल मिसळून टाळूला हलक्या हाताने मसाज करू शकता. (थेट लावू नका.)

Hair Care | Saam Tv

कोरफडीचा (अ‍ॅलोवेरा) जेल लावा

अ‍ॅलोवेरा जेल टाळूला थंडावा देण्यास आणि खाज कमी करण्यास मदत करू शकते. २०–३० मिनिटांनी केस धुवा.

Hair Care | Saam TV

संतुलित आहार घ्या

व्हिटॅमिन बी, झिंक, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Hair Care | Saam Tv

खाजवल्याने कोंडा वाढू शकतो

टाळूला सतत खाजवल्याने त्वचेवर जखमा होऊ शकतात आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे खाज आली तरी जोरात खाजवणे टाळा.

Hair Care | Saam tv

कोंडा कायम राहिल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या

काही आठवड्यांनंतरही कोंडा कमी होत नसेल किंवा लालसरपणा, सूज, तीव्र खाज किंवा केस गळणे वाढत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

Hair Care | Saam tv

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Foods for constipation | Sam Tv
येथे क्लिक करा