Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Shruti Vilas Kadam

पपई

पपईमध्ये भरपूर फायबर आणि पपेन हे एन्झाइम असते. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि मल मऊ ठेवून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकते.

Papaya | Saam Tv

ओट्सचा आहारात समावेश करा

ओट्समध्ये विद्रव्य फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे पचन सुरळीत राहते आणि नियमित शौचास मदत मिळते.

Home Remedies | yandex

हिरव्या पालेभाज्या खा

पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

green vegetables | canva

सफरचंद आणि पेर

या फळांमध्ये पेक्टिन आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे मलाचा आकार वाढतो आणि तो सहज बाहेर पडण्यास मदत होते.

Healthy Fruit | Saam Tv

भिजवलेले मनुके किंवा सुकी अंजीर

मनुके आणि अंजीर नैसर्गिक रेचक (Natural Laxative) मानले जातात. सकाळी भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

Raisins | pinterest

जवसाच्या बिया (Flax Seeds)

जवसामध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. या बिया पचनक्रिया सुधारण्यास आणि मल मऊ ठेवण्यास मदत करतात.

Flax Seeds | yandex

पुरेसे पाणी प्या

फक्त फायबरयुक्त आहार पुरेसा नसतो. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यास फायबर प्रभावीपणे काम करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

drink water | pinterest

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

Sleeping With Earplugs | Saam TV/Ai
येथे क्लिक करा