Skin Care: महागड्या स्किनकेअर कशाला? घरच्या घरी कमी खर्चात करा 'या' सोप्या स्किनकेअर

Shruti Vilas Kadam

दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवा

त्वचेवरील धूळ, तेल आणि घाण दूर करण्यासाठी सकाळी व रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा ताजी राहते.

Skin Care | Saam Tv

मॉइश्चरायझर वापरणे विसरू नका

त्वचेचा प्रकार कोणताही असो, योग्य मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि कोरडेपणा कमी होतो.

Face care | Saam tv

सनस्क्रीन रोज लावा

घराबाहेर पडताना किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन वापरा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.

Skin Care | Pintrest

भरपूर पाणी प्या

शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचेवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा.

Skin care | Saam tv

संतुलित आहार घ्या

फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळाल्याने नैसर्गिक चमक टिकून राहते.

Skin Care | Saam TV

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने त्वचेची दुरुस्ती (Repair) प्रक्रिया चांगली होते आणि चेहरा अधिक फ्रेश दिसतो.

Skin Care | Pintrest

मेकअप काढूनच झोपा

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढा. यामुळे रोमछिद्रे बंद होत नाहीत आणि मुरुमांचा धोका कमी होतो.

Skin Care

Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? 'हे' ७ सोपे उपाय करतील प्रॉब्लेम दूर, केसही राहतील हेल्दी

Hair Care
येथे क्लिक करा