Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे देशवासियांचे लक्ष असणार आहे.  Social Media
Sports

Paris Olympic 2024 : पहिल्याच दिवशी भारतीय उघडणार पदकाचं खातं? दावेदार कोण अन् कसं आहे वेळापत्रक?

India in Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 'कुंभमेळा' अर्थात ऑलिंपिक स्पर्धेचा नयनरम्य उद्घाटन सोहळा काल, २६ जुलैला झाला. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Saam Tv

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 'कुंभमेळा' अर्थात ऑलिंपिक स्पर्धेचा नयनरम्य उद्घाटन सोहळा काल, २६ जुलैला झाला. आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. यावेळच्या स्पर्धेत २०६ देशांचे १०७१४ खेळाडूंनी सहभाग घेतलाय. भारताच्या चमूत ११७ खेळाडू आहेत. १६ क्रीडा प्रकारांत ते सहभागी होणार आहेत. भारतानं मागच्या स्पर्धेत सात पदके जिंकली होती. यावेळी १० पदकांची आशा आहे.

पॅरिसमध्ये ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. २६ जुलै रोजी उद्घाटन सोहळा झाला. आजपासून मुख्य स्पर्धांना सुरुवात होतेय. पहिल्याच दिवशी भारताकडे पदके जिंकण्याची संधी आहे. आज नेमबाजांच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष आहे. याशिवाय टेबल टेनिस, रोईंग, बॅडमिंटनपटू आणि भारताचा हॉकी संघ अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

१० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात आज भारताच्या दोन जोड्या चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. तर पुरूष आणि महिला पिस्टल प्रकारात मनु भाकर, रिदम सांगवान आणि सरबज्योत सिंग यांसारखे स्टार खेळाडू आहेत. भारतीय हॉकी संघ गट फेरीतला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि महिला-पुरूष दुहेरी गटातही जलवा बघायला मिळणार आहे.

आजचं वेळापत्रक कसं असेल?

शूटिंग, १० मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम, पात्रता फेरी

दुपारी १२.३० वाजता.

खेळाडू - इलावेनिल आणि संदीप सिंग

रमिता जिंदल आणि अर्जुन बबुता

रोईंग (पुरूष स्कल्स हिट)

दुपारी १२.३० वाजता

बलराज पवार

घोडेस्वारी - ड्रेसेज

दुपारी १ वाजता.

अनुश अग्रवाल

शूटिंग (१० मीटर एअर पिस्टल पुरुष, पात्रता फेरी)

दुपारी २ वाजता

अर्जुन चीमा आणि सरबज्योत सिंग

टेनिस (पुरुष दुहेरी, पहिली फेरी)

दुपारी ३.३० वाजता

रोहन बोपन्ना आणि श्रीराम बालाजी

शूटिंग १० मीटर एअर पिस्टल महिला गट, पात्रता फेरी

संध्याकाळी ४ वाजता

मनु भाकर आणि रिदम सांगवान

बॅडमिंटन - पुरुष एकेरी, पुरूष दुहेरी

संध्याकाळी ५.३० वाजता

लक्ष्य सेन

सात्विक साइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी

टेनिस पुरुष एकेरी

संध्याकाळी ६.३० वाजता

सुमित नागल

टेबल टेनिस (पुरुष एकेरी)

संध्याकाळी ६.३० वाजता

हरमीत देसाई

पुरुष हॉकी, भारत विरुद्ध न्यूझीलंड

रात्री ९ वाजता

बॅडमिंटन (महिला दुहेरी)

रात्री ११ वाजता

अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो

बॉक्सिंग महिला, ५४ किलो वजनी गट - राउंड ऑफ ३२

रात्री ११. ३० वाजता

प्रीती पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT