neeraj chopra saam tv
Sports

Neeraj Chopra Javelin Prize: नीरज चोप्रा जो भाला वापरतो त्याचं वजन अन् किंमत किती?

Neeraj Chopra Javelin Weight And Prize: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान तो वापरतो त्या भाल्याचं वजन अन् किंमत किती?

Ankush Dhavre

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर लांब भाला फेकत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान आज तो आपला फायनलचा सामना खेळणार आहे. त्याचा रेकॉर्ड पाहता त्याला गोल्ड मेडलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना? नीरज चोप्रा जो भाला वापरतो त्याचं वजन आणि किंमत किती? तर जाणून घ्या.

भाल्याचं वजन किती?

भाल्याचं वजन आणि लांबी ही वेगवेगळी असू शकते. पुरुषांच्या भाल्याचं वजन हे ८०० ग्रॅमच्या आसपास असतं. तर लांबी २.६ ते २.७ मीटर इतकी असते. तर महिला जो भाला वापरतात त्याचं वजन हे ६०० ग्रॅम इतकं असतं. त्याची लांबी ही २.२ ते २.३ मीटर इतकी असते.

भाल्याची किंमत किती?

नीरज चोप्राने ज्या भाल्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तो भाला लिलावात १.५ कोटी रुपयांना विकला गेला होता. हा भाला बीसीसीआयने खरेदी केला होता. तर भाल्याची किंमत ही १००० ते ८०,००० रुपये इतकी असते. हा भाला तुम्ही स्पोर्ट्स स्टोअरमधून खरेदी करू शकता.

काय सांगतात नियम?

भालाफेकला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भाला फेकण्याची विशिष्ठ पद्धत आहे. जो भाला फेकणारा ॲथलिट असतो तो भाल्याचं टोक समोरच्या दिशेने ठेऊन भाला खांद्यावर घेऊन धावतो. त्यानंतर त्याला जितक्या लांब शक्य होईल तितक्या लांब तो भाला फेकू शकतो. भाला हवेत गेल्यानंतर त्याचं टोक हे जमिनीला स्पर्श करणं बंधनकारक असतं. प्रत्येक खेळाडूला ६ वेळेस भाला फेकण्याची संधी मिळते. ज्याचं अंतर जास्त त्याला विजयी घोषीत केलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT