indian womens table tennis team  twitter
Sports

Paris Olympics 2024,Table Tennis: भारतीय पोरींनी पॅरिस गाजवलं! रोमानियाला नमवत रचला इतिहास

India vs Romania, Paris olympics Pre Quarter Final Match: भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाला पराभूत करत इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताने ३ कांस्यपदकं पटकावली आहेत. तर काही इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडू पदकाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. दरम्यान भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहासाला गवसणी घातली आहे. महिला टेबल टेनिस संघातील खेळाडूंनी पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

यापूर्वी असा कारनामा कुठल्याच भारतीय खेळाडूंना करता आला नव्हता. ही किमया अर्चना कामथ, श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी साधली आहे. स्पर्धेतील उप उपांत्यफेरीत रोमामीयाचचा पराभव केला आहे. भारत आणि रोमानीया यांच्यात झालेल्या उप उपांत्यफेरीतील सामन्यात भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अर्चना कामथ आणि श्रीजा अकुल यांनी दुहेरीत प्रवेश केला. दुहेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय जोडीने समारा आणि एडीना या जोडीला ३-० ने धुळ चारली. हा सामना भारतीय जोडीने ११-९,१२-१० आणि ११-७ च्या फरकाने पराभव केला. पुढील सामन्यात मनिकाने बर्नाडेटचा ३-० ने पराभव केला. या सामन्यात मनिकाने ११-५,११-७,११-७ ने पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT