neeraj chopra twitter
क्रीडा

Neeraj Chopra: भारताच्या गोल्डन बॉयच्या वाटेतील मोठा अडथळा! हा खेळाडू नीरज चोप्राला देऊ शकतो आव्हान

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भालाफेक प्रकरात फानयलमध्ये प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत त्याने ८९.३४ मीटर लांब भाला फेकत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. नीरजला सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र चेत रिपब्लीकचा भालाफेकपटू त्याच्या वाटेतील अडथळा ठरु शकतो.

हा खेळाडू वाढवणार नीरज चोप्राचं टेन्शन?

नीरज चोप्रा हा सुवर्णपदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र चेक रिपब्लीकचा ३४ वर्षीय जेकब नीरज चोप्राच्या वाटेतील अडथळा ठरु शकतो. हा भालाफेकपटू सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. नीरज चोप्रा आपलं दुसरं ऑलिम्पिक खेळतोय. तर हा अनुभवी खेळाडू आपलं चौथं ऑलिम्पिक खेळतोय. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून नीरज चोप्राने सुवर्णपदकावर निशाणा साधला होता. तर जेकब रौप्यापदकाचा मानकरी ठरला होता. या स्पर्धेतही त्याने नीरजला कडवी झुंज दिली होती. त्यामुळे नीरजला जर सुवर्णपदक जिंकायचं असेल,तर जेकबपासून सावध राहावं लागणार आहे.

नीरजने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर लांब थ्रो केला होता. तर ८९.९४ मीटर हा नीरजचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो आहे. तर ९०.८८ हा जेकबचा सर्वोत्तम थ्रो आहे. दोघांचाही रेकॉर्ड पाहिला, तर जेकब आणि नीरज आतापर्यंत २१ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात नीरज चोप्राने १२ वेळेस जेकबपेक्षा सर्वोत्तम थ्रो केला आहे.

भारताने आतापर्यंत ३ पदकं जिंकली आहेत.

भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धत ३ कांस्यपदकं जिंकली आहेत. हे तिन्ही पदकं भारतीय खेळाडूंनी शूटिंगमध्ये पदकावली आहेत. भारतीय नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली होती. मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे २५ मीटर रायफल थ्री पोझिशन शूटिंग प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT