Neeraj Chopra  saam tv
क्रीडा

Paris Olympics : नीरज चोप्रा, विनेश फोगट अॅक्शनमध्ये, हॉकीचा संघ खेळणार सेमीफायनल!

Day 11 Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज निरज चोप्रा आणि विनेश फोगट अॅक्शनमध्ये दिसलीतल. तर पुरुष हॉकी संघाचा उपांत्य सामनाही आज होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paris Olympics 2024 Day 11 Schedule : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सोमवारी भारताला निराशा हाताला लागली. लक्ष्य सेन याला पदकाने हुलकावणी दिली. पण आज भारताकडून निरज चोप्रा, विनेश फोगट अॅक्शनमध्ये असतील. तर पुरुष हॉकी संघ उपांत्य सामन्यात मैदानात उतरणार आहे. बीडच्या अविनाश साबळे (Avinash Sable) यानं आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या भालापटू नीरज चोप्रा आज अॅक्शनमध्ये असेल. त्याशिवाय स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटही रिंगणात असेल. पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरत आहे, आजचा सामना जिंकून हॉकी संघ पदकाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

ऍथलेटिक्समध्ये दुपारी ३.२० पासून नीरज चोप्राची ॲक्शन दिसणार आहे. भारतीय चाहते बऱ्याच दिवसांपासून नीरज चोप्राच्या ॲक्शनची वाट पाहत होते. नीरज भालाफेकच्या ग्रुप-बीमध्ये आहे. दरम्यान, विनेश फोगटची कुस्तीमध्ये नशीब अजमावताना दिसेल. ती दुपारी 2:44 वाजता महिलांच्या 50 किलो गटात फेरी-16 साठी स्पर्धा करेल. राऊंड ऑफ 16 मध्ये फोगटचा सामना जपानच्या युई सुसाकीशी होणार आहे. त्यानंतर रात्री साडेदहा वाजल्यापासून भारतीय हॉकी संघ मैदानात असेल. आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणारा हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर जर्मनीचे आव्हान असेल.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचं आजच्या दिवसाचे वेळापत्रक (६ ऑगस्ट)

टेबल टेनिस

पुरुष सांघिक उपउपांत्यपूर्व (दुपारी १.३० वाजता) (भारत विरुद्ध चीन)

ऍथलेटिक्स

पुरुष भालाफेक

ए ग्रुप - किशोर जेना - (दुपारी १.५० वाजता)

बी ग्रुप - नीरज चोप्रा - (दुपारी ३.२० वाजता)

महिला ४०० मीटर रेपेचेज (दुपारी २.५० वाजता) (किरण पहल)

कुस्ती

महिला फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गट रेपेचेज (दुपारी २.३० वाजता) (निशा दहिया, जर पात्र ठरली तर)

महिला फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गट कांस्य पदक (मध्यरात्री १२.२० वाजता(७ ऑगस्ट) (जर पात्र ठरली तर)

महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपउपांत्यपूर्व फेरी (दुपारी ३.०० वाजता) (विनेश फोगट)

महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपांत्यपूर्व फेरी (दुपारी ४.२० वाजता) (जर पात्र ठरली तर)

महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपांत्य फेरी (रात्री १०.२५ वाजता) (जर पात्र ठरली तर)

हॉकी

भारत विरुद्ध जर्मनी उपांत्य फेरी (रात्री १०.३० वाजता)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT