VIensh phogat twitter
क्रीडा

Paris Olympics 2024, Vinesh Phogat: ऐसी धाकड है! विनेश फोगाटचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ११ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी डबल धमाक्याने सुरुवात केली आहे. स्पर्धेतील १० व्या दिवशी मराठमोळा अविनाश साबळे ३००० मीटर स्टीपलचेस इव्हेंटमध्ये पाचव्या क्रमांकार राहिला. तर ११ व्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताच्या २ स्टार खेळाडूंनी आपलं पदक जवळजवळ निश्चित केलं आहे. नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर विनेश फोगाटने क्वार्टर फायनलमध्ये ऑक्साना लिवाचला पराभूत करत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिने क्वार्टरफायनलमध्ये ७-५ ने विजय मिळवला आहे.

प्री क्वार्टर फायनलमध्ये शानदार विजय

प्री क्वार्टर फायनलमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये विनेश फोगाटचा सामना ऑक्साना लिवाचसोबत झाला. या सामन्यातही दोन्ही पैलवानांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र विनेश फोगाट या लढतीत आघाडीवर होती. तिने ही आघाडी शेवटपर्यंत आघाडीवर होती. शेवटच्या काही मिनिटात ऑक्साना लिवाचाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती विनेश फोगाटला मागे सोडू शकली नाही. शेवटी विनेशने हा सामना ७-५ ने आपल्या नावावर करत सेमिफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

क्वार्टर फायनलमध्ये गतविजेत्या खेळाडूचा पराभव भारताची स्टार पैलवान विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. तिने गतविजेत्या युवी सुसाकीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यातील अखेरच्या मिनिटापर्यंत सुसाकी ०-२ ने आघाडीवर होती. मात्र शेवटी विनेश फोगाटने मुसंडी मारली आणि विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT