indian hockey team  twitter
Sports

Paris Olympics 2024, Hockey: भारताची सेमिफायनलमध्ये थाटात एन्ट्री! ग्रेट ब्रिटेनला शूट- 'आऊट' करत रचला इतिहास

India vs Great Britain, Hockey Quarter Final Match Result: भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये ग्रेट ब्रिटेनला पराभूत केलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये भारतीय हॉकी संघाने ग्रेन बिटेनला शूटआऊटमध्ये पराभूत करत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमिफानयलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाला १० खेळाडू घेऊन लढावं लागलं. कारण सामन्यातील १७ व्या मिनिटाला अमित रोहिदासला रेड कार्ड मिळालं होतं. सामन्यातील २२ व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आलाय. भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर हरमनप्रीत सिंगने पहिला गोल केला. यासह भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. सामन्यातील २७ व्या मिनिटाला, मॉर्टन ली ने गोल केला आणि ग्रेट ब्रिटनला १-१ च्या बरोबरीत आणलं.

सामना बरोबरीत सुरु होता, मात्र दोन्ही बाजूंनी जोरदार आक्रमण सुरु होतं. भारताची भिंत श्रीजेश यावेळीही ढाल बनून उभी होती. त्याने ब्रिटेनकडून येणारा एकही चेंडू गोल पोस्टमध्ये जाऊ दिला नाही. शेवटी या सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये लागला. ग्रेट ब्रिटेनकडून पहिला गोल जेम्स एलबेरीने केला. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने गोल करत गोलची बरोबरी केली. त्यानंतर झॅच वॅलासेने गोल करत भारताला २- १ न गोल करत ब्रिटनला २-१ ने आघाडी मिळवून दिलंय

भारताकडून तिसऱ्या प्रयत्नासाठी सुखजीत सिंग आला. त्यानेही गोल करत भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. ग्रेट ब्रिटनकडून विलियम्सन कोनोरचा प्रयत्न श्रीजेशने हाणून पाडला. त्याने गोल थांबवला. ज्यानंतर राजकुमार पालने गोल करत भारताला हा सामना १-१ (४-२ ) ने जिंकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT