indian hockey team twitter
Sports

IND vs IRE, Hockey: टीम इंडिया ऑन टॉप! न्यूझीलंडनंतर आयर्लंडला २-० ने लोळवलं

Paris Olympics 2024, Hockey: भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आता आयर्लंडला २-० ने लोळवलं आहे.

Ankush Dhavre

ऑलिंपिंक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दमदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी स्ट्रोकच्या बळावर ३-२ ने बाजी मारली होती. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतच्या एकमेव गोलमुळे भारतीय संघाचा पराभव टळला होता. दरम्यान आता आयर्लंडला पराभूत करत भारतीय संघाने या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, भारतासमोर अर्जेंटिनाचं आव्हान होतं. हा सामना बरोबरीत समाप्त झाला होता. तिसऱ्या सामन्यात आज भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या सेटमधील शेवटच्या ५ मिनिटात भारताने गोलचं खातं उघडलं. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हरमनप्रीतने संधीचं सोनं करत पहिला गोल केला.

यासह भारताने या सामन्यात १-० ने आघाडी घेतली. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताने आघाडी घेतली. कारण यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विरोधी संघाने पहिला गोल केला होता. आघाडी घेतल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी आक्रमण सुरु ठेवलं. दुसऱ्या सेटमधील चौथ्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पुन्हा एकदा हरमनप्रीत सिंगने संधीचं सोनं केलं. हरमनप्रीत सिंगने गोल करत २- ० ची आघाडी मिळवली. ही आघाडी भारताने शेवटच्या मिनिटापर्यंत टिकवून ठेवली. आयर्लंडला ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले,मात्र भारतीय खेळाडू भिंतीसारखे गोल पोस्टसमोर उभे राहिले. यासह भारताने या सामन्यात २-० ने बाजी मारली. भारताचे पुढील २ सामने ऑस्ट्रेलिया आणि बेल्झियम संघाविरुद्ध होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT