lakshya sen  twitter
क्रीडा

Paris Olympics 2024, Badminton: अखेरपर्यंत लढला पण पदक थोडक्यात हुकलं! Lakshya Sen चा पराभव

Paris Olympics 2024, Lakshya Sen vs Lee Zii Jia, Badminton Bronze Medal Match: भारताचा युवा स्टार खेळाडू लक्ष्य सेनला भारताला कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

जे आजवर कुठल्याच भारतीय बॅडमिंटनपटूला जमलं नव्हतं,ते २२ वर्षीय लक्ष्य सेनला करण्याची संधी होती. गोल्ड मेडलचं स्वप्नं घेऊन पॅरिस गाठलेल्या लक्ष्यला सेमिफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र ही संधी हुकल्यानंतर त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. ऑलिम्पिक पदत विजेत्या खेळाडूला बरोबरीची टक्कर देऊन तो थोडक्यात मागे राहिला. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याने मलेशियाच्या ली झी जियाचा बरोबरीची टक्कर दिली. मात्र त्याला २१-१३,१६-२१ आणि २१-११ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

उंपात्य फेरीतील सामन्यातही लक्ष्य सेनने शानदार कामगिरी केली होती. मात्र थोडक्यात त्याला हा सामना गमवावा लागला होता. हीच सुरुवात त्याने कांस्यपदकासाठीच्या सामन्यात केली. पॉईंट स्कोअर करण्याची सुरुवात लक्ष्य सेनने केली. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये त्याने आघाडी घेतली आणि ही आघाडी राखून ठेवली. या सेटमध्ये लक्ष्य सेनने २१-१३ ने बाजी मारली.

सामन्यातील दुसऱ्या सेटमध्येही लक्ष्य सेनने शानदार सुरुवात केली. या सेटमध्ये दोघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. यावेळी त्याने आघाडी घेतली. मात्र त्याला आघाडी टीकवून ठेवता आली नव्हती. जिया १२ गुणांवर असताना लक्ष्य सेन ४ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र त्याने लागोपाठ ४ गुणांची कमाई करत बरोबरी साधली. त्यानंतर जियाने कमबॅक केलं आणि २ गुणांची कमाई केली. लक्ष्य सेनने मारलेल्या जियाकडे काहीच उत्तर नव्हतं. या सेटमध्ये जियाने बाजी मारली

लक्ष्य सेनचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास

लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात त्याने शानदार विजय मिळवला होता. मात्र विरोधी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्याचा हा सामना गृहीत धरला गेला नव्हता. साखळी फेरीतील पुढील सामन्यात त्याने जुलीएन कॅरेगीचा २१-१९,२१-१४ ने पराभव केला होता. त्यानंतर पुढील सामन्यात त्याने जोनाथन ख्रिस्तीचा २१-१८, २१-१२ ने पराभव केला.

राऊंड ऑफ १६ मध्ये भारताचे दोन्हीस स्टार खेळाडू आमने सामने आले होते. त्याने एचएस प्रणॉयचा २१-१२,२१-६ ने एकतर्फी पराभव केला होता. उंपात्यपूर्व फेरीतील सामन्यात त्याने चिनी ताईपैच्या चो टियेन चेनचा १९-२१,२१-१५,२१-१२ ने पराभव केला होता. सेमिफायनलमध्ये त्याला विक्टर एक्सेलेसेनकडून २२-२०, २१-१४ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT