team india team india
Sports

Paris Olympics 2024, Archery: कांस्यपदक थोडक्यात हुकलं! तिरंदाजीत भारताचं पहिलं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं

Ankita Bhakat/Dhiraj Bommadevara vs Brady Ellison/Casey Kaufhold Bronze Medal Match Result: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरदाजांना इतिहास रचण्याची संधी होती. मात्र ही संधी गमावली आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शूटिंगमध्ये भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) तिरंदाजीतही भारतीय खेळाडूंना मिश्र गटाच्या अंतिम फेरीत जाण्याची संधी होती. मात्र उपांत्य फेरीत कोरीयाच्या जोडीने भारतीय जोडीला पराभूत केलं. त्यानंतर कांस्पदकासाठी युएसएविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाचं आणखी एक पदक निसटलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना पदकाचं खातं उघडता आलेलं नाही. तर आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेतील इतिहास पाहिला, तर भारताला तिरंदाजीत एकही पदक जिंकता आलेलं नाही. त्यामुळे कांस्यपदक जिंकून अंकिता आणि धीरजला इतिहास रचण्याची संधी होती. मात्र ही संधी भारतीय जोडीने गमावली आहे. भारतीय जोडीने हा सामना गमावला असला, तरीदेखील ही भारतीय जोडीसाठी अभिमानाची बाब आहे. कारण भारतीय जोडी पहिल्यांदाच पदकासाठी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली होती.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारताकडून अंकिता भगत व धीरज बोम्मादेवरा तर युएसएकडून ब्रॅडी एलीसन व केसी कोफहोल्डची जोडी मैदानात होती. या सामन्यात ब्रॅडी एलीसन व केसी कोफहोल्डने शानदार सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये या जोडीने ३८-३७ ने आपल्या नावावर केली. या सेटमध्ये ऑस्ट्रेलियन जोडीने २ गुणांची आघाडी घेतली. त्यांतर दुसऱ्या सेटही या जोडीने ३७ -३५ ने आपल्या नावावर केला.

या सेटमध्येही २ गुणांची कमाई करत युएसने ४-० ची आघाडी घेतली होती. सुरुवातीचे २ सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने तिसऱ्या सेटमध्ये शानदार कमबॅक करत २ गुणांची कमाई केली. चौथ्या सेटपर्यंत भारतीय जोडी ४-२ ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतीय जोडीला चौथा सेट कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. मात्र या सेटमध्येही भारतीय जोडी३७-३५ ने पिछाडीवर. या पराभवासह भारतीय जोडीने कांस्यपदक जिंकून इतिहास रचण्याची संधी गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ॲक्सिस बँकेच्या एटीएम मशीनला आग, पाहा VIDEO

Dandoba Hill Station: स्वर्गापेक्षा सुंदर! सांगलीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' सुंदर हिल स्टेशन

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

सरकारी काम, सहा महिने थांब... शिक्का पुसला जाणार, KDMC मध्ये राज्यातील पहिला प्रयोग, १५ ऑगस्टपासून सुरू

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले; १० तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT