shoaib malik marries instagram
Sports

Shoaib Malik marries : शोएब मलिकनं लग्नाचा फोटो केला शेअर; कोण आहे तिसरी बायको?

Shoaib Malik Marriage: दोघांमध्ये घटस्फोट झाल्याची चर्चा सुरु असताना, शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्याची बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

Shoaib Malik Married With  Sana Javed:

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघेही चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांमध्ये घटस्फोट झाल्याची चर्चा सुरु असताना, शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्याची बातमी समोर आली आहे. या विवाह सोहळ्यातील फोटो त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

शोएब मलिकने २० जानेवारी रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आता लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनीही या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Latest sports updates)

या आधीही झालंय लग्न..

शोएब मलिकची पत्नी सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. ती २०२० मध्ये उमेर जसवालसोबत विवाह बंधनात अडकली होती. मात्र दोघांचं नातं फार काळ टीकू शकलं नाही. त्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला. शनिवारी त्याने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत हटके कॅप्शनही दिले आहे. २०१० मध्ये सानिया मिर्झासोबत विवाह करण्याआधी त्याने आयशा सिद्दीकीला घटस्फोट दिला होता.

कोण आहे सना जावेद?

विवाहबंधनात अडकताच सनाने आपलं इंस्टाग्रामवरील नाव बदलून सना शोएब मलिक असं ठेवलं आहे. सनाने २०२० मध्ये पाकिस्तानी गायक उमेर जयस्वालसोबत विवाह केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबियात झाला. तिने अनेक उर्दू टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१२ मध्ये तिने शेर-ए-जात या मालिकेतून पदार्पण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT