Pakistan Super League 2024 Update: Pakistani Cricketer Iftikhar Ahmed and England batter Jason Roy Spat in Pakistan Super League video viral  Twitter
Sports

PSL 2024: पाकिस्तानी खेळाडूचं इंग्लंडच्या खेळाडूशी इंग्रजीत भांडण; VIDEO व्हायरल

Iftikhar Ahmed And Jason Roy Fight Video: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत रन्स, विकेट्स आणि रेकॉर्डपेक्षा वाद-विवादांची जोरदार चर्चा सुरु आहे

Ankush Dhavre

Iftikhar Ahmed And Jason Roy Spat

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत रन्स, विकेट्स आणि रेकॉर्डपेक्षा वाद-विवादांची जोरदार चर्चा सुरु आहे.प्रत्येक सामन्यात काही ना काही वाद होत असतो ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. नुकताच क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुल्तान सुल्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यादरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुल्तान सुल्तान संघातील खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. चाचा म्हणून प्रसिद्ध असलेल्या इफ्तिकार अहमदने थेट इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जेसन रॉयसोबत पंगा घेतला. मग काय, जेसन रॉय इंग्रजीत भांडत होता तर इफ्तिकार अहमद त्याला हिंदीतून उत्तर देत होता. हा वाद वाढणार इतक्यात संघातील इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली. पाकिस्तान संघातील यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान जेसन रॉयची समजूत काढताना दिसून आला. (Cricket news in marathi)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, DRS घेण्यासाठी जेसन रॉय आपल्या सह फलंदाजाकडे जात असतो त्यावेळी इफ्तिकार अहमद मध्ये येतो आणि जेसन रॉयला काहीतरी बोलतो. त्यानंतर जेसन रॉय देखील त्याला तोडीत तोड उत्तर देतो.

दोघांमध्ये जोरदार वाद रंगतो. हा वाद पुढे जाणार इतक्यात संघातील इतर खेळाडू पुढाकार घेऊन वाद थांबवतात. मोहम्मद रिजवान हा मुल्तान सुल्तान संघाचं नेतृत्व करतोय. तो जेसन रॉयला समजवतो. त्यानंतर बाद झालेला जेसन रॉय मैदानाच्या बाहेर जातो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुल्तान सुल्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ४ गडी बाद १८५ धावा केल्या. यादरम्यान मोहम्मद रिजवानने ४७ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली. तर जॉन्सन चार्ल्सने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला १०६ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT