PAK vs NZ match  Saam tv
Sports

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

PAK vs NZ match : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात पावसाच्या फटकेबाजीमुळे सामना रद्द करावा लागला.

Vishal Gangurde

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सुपर- 8 सामना रद्द

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार होता.

दोन्ही संघांना मिळाले प्रत्येकी १-१ गुण

Pakistan vs New Zealand: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर - 8 चा पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. दोन्ही संघाचा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये होणार होता. पावसामुळे पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये चर्चा करून सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला.

सामन्यात टॉसदरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होता. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मैदानात आले होते. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीने टॉस जिंकला होता. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टॉस झाल्यानंतर कर्णधार ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. काही तासानंतर पाऊस बंद झाला.

स्पर्धेत सेमीफायनल आणि फायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. परंतु इतर सामन्यासाठी रिझर्व्ह डेची सुविधा ठेवण्यात आलेली नाही. सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाला प्रत्येकी एक-एक गुण मिळाला. एक गुण मिळाल्याने सामना जिंकण्याचा इच्छा बाळगणाऱ्या संघाला फक्त १ गुणावर समाधान मानावं लागलं. परंतु सामना रद्द झाल्याने पाकिस्तान संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दोन्ही संघात कोणाला मिळाली होती संधी?

न्यूझीलंड: टिम सीफर्ट (विकेटकिपर), फिन अ‍ॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सॅन्टनर (कर्णधार), मॅट हेन्री, ईश सोढी आणि लॉकी फर्ग्युसन, जेम्स नीशम

पाकिस्तान: साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान, उस्मान खान (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, मोहम्मद सलमान मिर्झा , उस्मान तारिक, बाबर आझम, फखर झमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT