PAK vs NED World Cup 2023 saam tv
क्रीडा

PAK vs NED World Cup 2023: विश्वचषकात पाकिस्तानची धमाकेदार सुरुवात; नेदरलँडवर ८१ धावांनी मिळवला मोठा विजय

PAK vs NED World Cup 2023: विश्वचषकाच्या दुसऱ्या सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये झाला.

Vishal Gangurde

PAK vs NED, World Cup 2023 :

विश्वचषक स्पर्धेत दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँडमध्ये झाला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडला धुळ चारली. नेदरलँडला पराभूत करत या स्पर्धेत पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ८१ धावांनी विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

नेदरलँडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. पाकिस्तानने ४९ षटकात १० गडी गमावून २८६ धावा कुटल्या. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. नेदरलँडच्या मॅक्सला सहाव्या षटकात बाद केलं. मॅक्सने १२ चेंडूत ५ धावा कुटल्या. (Latest Marathi News)

नेदरलँडचा कॉलिनच्या रुपात दुसरा धक्का बसला. कॉलिनने २१ चेंडूत १७ धावा कुटल्या. कॉलिन बाद झाल्यानंतर विक्रमजीत आणि लीडे याने संघाचा डाव सांभाळला. विक्रमजीतने ६६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

या अर्धशतकात चार चौकार आणि १ षटकाराचा सामावेश आहे. मात्र, विक्रमजीत अर्धशतक झाल्यावर खेळपट्टीवर टिकला नाही. विक्रमजीतने ६७ चेंडूत ५२ धावा केल्या. विक्रमजीतला शादाब खानने झेलबाद केले.

पाकिस्तानचा जलद गोलंदाज रउफने एकाच षटकात दोन गडी बाद केले. रउफने तेजा आणि एडवर्ड्सला बाद केलं. नेदरलँडचा स्टार खेळाडू लीडे हा ६७ धावांवर बाद झाला.

पाकिस्तानने लागोपाठ गडी बाद करत नेदरलँडवर दबाव आणला. नेदरलँडला १०३ धावांची गरज असताना त्यांचे ८ गडी तंबूत होते. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इतर दोन गोलंदाजांनाही सहज बाद केले. यामुळे पाकिस्तानने नेदरलँडवर ८१ धावांनी विजय मिळवला आहे.

पाकिस्तानसाठी मोहम्मदने ७५ चेंडूत ६८ धावा कुटल्या. शकीलने ५२ चेंडूत ६८ धावा कुटल्या. तर रउफने संघासाठी ३ गडी बाद केले. तर हसन अलीने दोन गडी बाद केले. पाकिस्तानने दोन विश्वचषकानंतर पहिल्यांदा विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT