AFG vs PAK Twitter
Sports

AFG vs PAK: चेन्नईत पाकिस्तानला अफगाणी दणका! फलंदाजांच्या दमदार कामगिरीनं मिळवला दुसरा विजय

AFG vs PAK: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले.

Vishal Gangurde

Pakistan vs Afghanistan World cup 2023:

विश्वचषकात आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तामध्ये रोमांचक सामना झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. पाकिस्तानने दिलेलं २८३ धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सहज पार करत मोठा विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ गडी गमावून २८२ कुटल्या. पाकिस्तानसाठी बाबर आझमने सर्वाधिक धावा केल्या होत्या. बाबरने ९२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ७४ धावा कुटल्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानने १० षटकात ६३ धावा कुटल्या. जादरानने संयमी खेळ दाखवत ५४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. जादराननंतर गुरबाजचंही अर्धशतक झालं. गुरबाजने चौथं अर्धशतक ठोकलं. अफगाणिस्तानने १६ व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या.

पाकिस्तानच्या शाहीनने अफगाणिस्तानची सलामी जोडी फोडली. शाहीन अफरिदीने गुरबाजला बाद केले. त्यानंतर हसन अलीने इब्राहिद जादरानला ८७ धावांवर बाद केले.

अफगाणिस्तानला ६ षटकात ३५ धावा हव्या होत्या, त्यावेळी अफगाणिस्तानच्या संघाने संयमी खेळ दाखवला. अफगाणिस्तानने ४८ व्या षटकात पाकिस्तानचा मोठा पराभव केला. पाकिस्तानचा पराभव करत अफगाणिस्तानने दुसरा विजय साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT