World Cup 2023 : पराभव झाला अफगाणिस्तानचा, गेम पाकिस्तानचा; गुणतालिकेत मोठा उलटफेर

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र पालटत आहे.
World Cup 2023
World Cup 2023Saam Tv
Published On

World Cup 2023 Points Table :

एकदिवशीय वर्ल्डकप स्पर्धेत दमदार सामने पाहायला मिळत आहेत. आज टीम इंडियाचा दुसरा सामना अफगाणिस्तानसोबत झाला. या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला ८ विकेट राखत पराभूत केलं. या सामन्यामुळे वर्ल्डकपच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. यामुळे पराभव अफगाणितास्तानचा जरी झाला असला तरी हादरा मात्र पाकिस्तानच्या संघाला बसला आहे. (Latest News)

काल झालेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला. विजयामुळे पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता, परंतु अफगाणिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने पाकिस्तानला त्या स्थानावर दूर केलं आहे. उपांत्या फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाची साखळी फेरीत धडपड सुरू आहे. १० पैकी ४ संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. यासाठी गुणांसह चांगल्या नेट रनरेटची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक विजयामुळे गुणतालिकेचं गणित बदलत आहे. भारत अफगाणिस्तान सामना होईपर्यंत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. पण भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत गुणतालिकेत मोठी झेप घेतली.

नवीन गुणतालिकेनुसार, भारताने गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा संघ २ पैकी २ सामने जिंकत ४ गुणांसह +१.९५८ नेट रनरेटने आघाडीवर आहे. तर भारतीय संघ २ पैकी २ सामने जिंकत ४ गुणांसह +१.५०० नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ २ पैकी २ सामने जिंकत ४ गुणांसह +०.९२७ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेतील चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे.

दरम्यान भारताचा पुढचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यातील निकाल दोन्ही संघांची पुढची वाटचाल निश्चित करेल. पाकिस्तानने आतापर्यंत दुबळ्या संघांशी सामना केला आहे. खऱ्या अर्थाने पुढची लढाई कठीण असेल. त्यामुळे जसजशी स्पर्धा पुढे सरकेल तसा गुणतालिकेत मोठा बदल दिसून येईल. टॉपला असलेला संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी दोन हात करणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघाची उपांत्य फेरीत लढत होईल.

World Cup 2023
Rohit Sharma News: रोहित शर्माने षटकार मारत मोडला ख्रिस गेलचा विक्रम; हिटमॅन झाला जगातला नंबर वन सिक्सर किंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com