Virat kohli
Virat kohli saam tv
क्रीडा | IPL

'आपला अॅटीट्यूड सुधारा', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा विराट कोहलीला सल्ला

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही सामन्यांमध्ये खराब फॉर्मातून जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये काही सामने वगळता विराटची सुमार कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान, आगामी होणाऱ्या भारत- इंग्लंडच्या कसोटी (India-England Test) सामन्यात कोहली फॉर्ममध्ये वापसी करण्यासाठी कंबर कसत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) विराट कोहलीला मोठा सल्ला दिला आहे.

विराटला पुन्हा एकदा नंबर १ व्हायचं आहे ? आफ्रिदी म्हणाला....

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, विराट कोहलीला स्वत:ची परीक्षा घ्यावी लागेल आणि आपल्या अॅटीट्यूडकडे पाहावं लागेल. क्रिकेटमध्ये अॅटीट्यूड हा सर्वात महत्वाचा भाग आहे. मला सर्वप्रथम याबाबतच बोलायचं आहे. क्रिकेटबाबत तुमचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे ? जसं की, विराट कोहली त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा जगातील नंबर १ फलंदाज बनायचं होतं. विराट खरचं त्याच प्रेरणेनं क्रिकेट खेळत आहे, हा मोठा प्रश्न आहे. विराटकडे क्लास आहे.

परंतु, विराटला खरंच पुन्हा एकजा नंबर १ व्हायचं आहे की, जीवनात सगळं काही मिळालं आहे, असं कोहलीला वाटत आहे. आता फक्त आराम आणि टाईमपास करा ? हा विषय अॅटीट्यूडचा आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली यंदाच्या मोसमात खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या हंगामातही विराटने अपेक्षित अशी चमकदार कामगिरी केली नाही. कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यांमध्ये २२.७३ च्या सरासरीनं ३४१ धावा केल्या. ज्यामध्ये फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एवढच नाही तर विराट तीनवेळा गोल्डन डकवर आऊटही झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs KKR, IPL 2024: मुंबईसाठी 'करो या मरो' ची लढत! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : खरी शिवसेना शिंदेंकडे; अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

SCROLL FOR NEXT