भारत-आर्यलॅंड सीरिजसाठी हार्दिक पंड्या कर्णधार, BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

बीसीसीआयने आर्यलॅंड विरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजसाठी भारताच्या संघाची घोषणा केली आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच टी-२० सामन्यांची सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारताचा संघ २-१ ने पिछाडीवर आहे. भारताला दक्षिण आफ्रिके विरोधातील सीरिजमध्ये विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढील होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय संपादन करावं लागणार आहे. त्यामुळे कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आता विजयासाठी कोणती रणनीती आखणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) आर्यलॅंड विरुद्ध (India-Irland series) होणाऱ्या टी-२० सीरिजसाठी भारताच्या संघाची घोषणा केली आहे.

Hardik Pandya
Test Cricket Ranking: कसोटी क्रमवारीत 'या' क्रिकेटपटूचा जलवा, कोहली, रोहित कुठंय?

विशेष म्हणजे भारत-आर्यलॅंड (India-Irland series) सीरिजसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या गुजरात टायटन्स संघांचं नेतृत्व हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) केलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हार्दिकला नेतृत्वाची चमक दाखवण्याची संधी भारतीय संघात मिळाली आहे. तर भारताचा वेगवान आणि अनुभवी खेळाडू भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलीय.

दरम्यान, भारत आणि आर्यलॅंडमध्ये जून महिन्याच्या अखेरीस दोन टी-२० सामने होणार आहेत. निवड समितीने या सीरिजसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच संधी दिली आहे. तसेच राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचवणाऱ्या विकेटकीपर संजू सॅमसनचंही टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.

Hardik Pandya
Test Cricket Ranking: कसोटी क्रमवारीत 'या' क्रिकेटपटूचा जलवा, कोहली, रोहित कुठंय?

हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी

भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आर्यलॅंडविरद्ध होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी कर्णधार असणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेत पाच टी-२० सामन्यांसाठी मालिका सुरु असून हार्दिक भारतीय संघाचा उप कर्णधार आहे. या सीरिजसाठी के एल राहुलला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जायबंदीमुळे के एल राहुल या सीरिजमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे रिषभ पंतला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं असून हार्दिकच्या खांद्यावर उप कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

भारतीय संघ :हार्दिक पंड्या (कर्णधार ), भुवनेश्वर कुमार (उप कर्णधार ), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com