मुंबई: आयसीसीनं ताजी कसोटी क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचे दोन खेळाडू आहेत. इंग्लंड कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट (joe root) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली फलंदाजी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जो रूटने धावांचा पाऊस पाडला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत (Test Cricket) खोऱ्यानं धावा काढणाऱ्या जो रूटला कसोटी क्रमवारीत त्याचा फायदा झाला आहे. जो रूट कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. आयसीसीने बुधवारी कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून, रूट हा फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन अव्वल स्थानी होता. मात्र, जो रूटने या मालिकेत धडाकेबाज फलंदाजी करून त्याला मागे टाकले. जो रूटचे आता ८९७ गुण झाले आहेत. तर लॅब्युशेनचे ८९२ गुण आहेत.
टॉप टेन कसोटी फलंदाज
१. जो रूट
२. मार्नस लॅब्युशेन
३. स्टीव्ह स्मिथ
४. बाबर आझम
५. केन विलियम्सन
६. डिमुथ करुणारत्ने
७. उस्मान ख्वाजा
८. रोहित शर्मा
९. ट्रेविस हेड
१०. विराट कोहली
टीम इंडियाच्या फलंदाजांच्या बाबतीत विचार केला तर, कसोटी क्रमवारीत अव्वल १० मध्ये केवळ दोन भारतीय फलंदाज आहेत. रोहित शर्मा हा ७५४ गुणांसह आठव्या स्थानी आहे. तर विराट कोहली हा ७४२ गुणांसह क्रमवारीत दहाव्या स्थानी आहे. जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत फक्त दोनच सामने खेळलेले आहेत. त्यात त्याने ३०५ धावा केल्या आहेत. यात २ शतकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.