Pakistan semi final hopes saam tv
Sports

Pakistan qualification chances: किवींचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर; ६४ रन्स आणि १३.१ ओव्हर्सचं समीकरण नेमकं कसं?

Pakistan semi final hopes: इंग्लंडच्या विजयामुळे सेमीफायनल शर्यत अधिक रंगतदार झाली असून पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक आहे. नेट रन रेटमुळे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात इंग्लडने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या पराभवाने पाकिस्तान टीमच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा अजूनही पल्लवित राहिल्यात. आज म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यानंतर ग्रुप २ चं सेमीफायनलचं चित्र स्पष्ट होणार आहे.

पाकिस्तानच्या टीमला सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध मोठा विजयाची गरज आहे. ज्यामुळे त्यांचं नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगलं असेल.

जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना श्रीलंकेला किमान ६४ रन्सने पराभूत करावं लागणार आहे. जर ते आव्हानाचा पाठलाग करत असतील तर त्यांना सामना १३.१ ओव्हर्समध्ये संपवावा लागणार आहे. जर पाकिस्तान असं करण्यात अपयशी ठरला तर न्यूझीलंड थेट सेमीफायनल गाठणार आहे. याचा अर्थ नेट रन रेटमुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.

पाकिस्तानचं नेट रन रेट -०.४६१ आहे तर न्यूझीलंडचं १.३९० आहे. न्यूझीलंडचे ३ गुण आहेत तर पाकिस्तानच्या खात्यात १ गुण आहे. पाकिस्तानसाठी आजाचा सामना हा 'करो या मर'च्या परिस्थितीचा आहे. तर न्यूझीलंडचं भवितव्य आजच्या या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे. जर पावसाने हा सामना खेळवला गेला नाही तरीही न्यूझीलंडला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे.

कुठे रंगणार सेमीफायनलचे सामने?

समीकरणानुसार, जर न्यूझीलंडने सेमीफायनल गाठली तर स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना ४ मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. तर दुसरी सेमीफायनल ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी

Shukra Gochar: पुढच्या तीन दिवसात नशीब पालटणार; शुक्र नक्षत्राने घरात येणार पैसाच पैसा, व्यवसायात होणार प्रगती

'फास्ट ट्रॅक'मध्ये अन्यायाचा 'स्लो ट्रॅक' कसा झाला? अत्याचाराचा विळखा कधी सुटणार?

साताऱ्यातील पठ्ठ्याने चक्क डोंगर फोडलाय; 67 वर्षांचा हा माऊंटन मॅन कोण?

Untitled May 06, 2026 02:29 am

SCROLL FOR NEXT