icc champions trophy 2025 saam tv
Sports

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात जावं लागेल? समोर आलं मोठं कारण

Pakistan Cricket Board: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाहीये.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र माध्यमातील काही वृत्तांमध्ये असा दावा केला गेला आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ पाकिस्तानात जाणार नाही. मात्र पाकिस्तानने भारताचा संघ पाकिस्तानात येणार हे ग्राह्य धरुन तयारी करायला सुरुवात केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वादांमुळे दोन्ही देशातील खेळाडू द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी दौरा करत नाही. या महिन्याच्या सुरुवातीला राजीव शुक्ला म्हणाले होते की, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, हे सरकार ठरवणार. हे माहित असतानाही पाकिस्तानने प्लान बी तयार केलेला नाही.

यापूर्वी झालेल्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यासाठी नकार दिला. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. यासह स्पर्धेतील बाद फेरीतील सामनेही श्रीलंकेत खेळवले गेले होते.

माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने प्लान बी तयार केलेला नाही. पाकिस्तानला अजूनही वाटतंय की, भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात येणार.त्यामुळे पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यास नकार दिला आहे.

या वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यासाठी इतर देशांसोबत कुठलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे भारतीय संघासमोर दुसऱ्या देशात जाऊन सामने खेळण्याचा पर्याय शिल्लक राहणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. मात्र भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही आणि या स्पर्धेतील सामने कुठे होणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT