भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानच्या 'AK-47' स्टाईल सेलिब्रेशनवर
भारतीय चाहत्यांकडून सोशल मीडियावर फरहानवर दहशतवादी पद्धतीने सेलिब्रेशन केल्याचा आरोप
फरहानने पत्रकार परिषदेत सांगितलं की, लोक काय विचार करतील याची पर्वा नाही
फरहानच्या सेलिब्रेशनवर सोशल मीडियावर टीका सुरूच
भारत-पाकिस्तान सामन्यात साहिबजादा फरहानचं एके-४७ सेलिब्रेशनवर जोरदार टीका होत आहे. भारतीय चाहत्यांकडून साहिबजादा फरहानने दहशतवादी विचारांचं प्रदर्शन केल्याचं म्हणत टीका केली आहे. भारतीयांनी केलेल्या टीकेनंतरही फरहानने त्याच्या सेलिब्रेशनचं समर्थन केलं आहे.
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानी संघाला धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा सामना आता श्रीलंकेशी होणार आहे. तर श्रीलंकेला देखील बांगलादेशने पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फरहानने त्याच्या सेलिब्रेशनचं समर्थन केलं आहे.
पाकिस्तानी खेळाडू फरहानने म्हटलं की, 'तुम्ही त्या षटकाराविषयी बोलत असाल, तर भविष्यात आणखी षटकार पाहायला मिळतील. ते सेलिब्रेशन त्यावेळेचं होतं. मी ५० धावा पूर्ण केल्यानंतर फार अधिक सेलिब्रेशन करत नाही. मला अचानक वाटलं, त्यानंतर मी सेलिब्रेशन केलं. मला माहीत नव्हतं की, लोक त्यावर कसा विचार करतील. मला त्याची परवा देखील नाही'.
'तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता. ते आक्रमकपणे खेळलं पाहिजे. मग समोर गरजेचं नाही की, भारतच असावा. तुम्हाला प्रत्येक क्रिकेट संघाच्या विरोधात आक्रमकरित्या खेळलं पाहिजे. जसे आम्ही खेळलो', असेही त्याने सांगितलं.
भारताच्या विरोधात साहिबजादा फरहानने ४५ चेंडूत ५८ धावा कुटल्या. त्याने डावात ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. कालच्या सामन्यात भारताच्या शिवम दुबेने फरहानला घरचा रस्ता दाखवला. फरहानचा झेल सूर्यकुमार यादवने घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.