Pakistan Team Arrives in India Saam tv
Sports

Pakistan Team Arrives in India: पाकिस्तानी टीम तब्बल 7 वर्षांनंतर भारतात; संपूर्ण संघ व्हाया दुबईमार्गे येण्याचं कारण काय?

Pakistan Team Arrives in India: वनडे वर्ल्ड कप २०२३ साठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आला आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना नेदरलँडसोबत ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Vishal Gangurde

Pakistan Cricket Team:

वनडे वर्ल्ड कप २०२३ साठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आला आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना नेदरलँडसोबत ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँडचा हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तान संघाला भारतात येण्याचा व्हिसा मिळाला नव्हता. त्यानंतर पाकिस्तानी संघाने याची तक्रार आयसीसीला केली होती. त्यानंतर आज पाकिस्तानी संघाचं भारतात जोरदार स्वागत झालं. भारतात आगमन झाल्यानंतर संपूर्ण संघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी संघाचं हैदराबादमध्ये जल्लोषात स्वागत झालं. अनेक क्रिकेट चाहते बाबर आझम आणि संपूर्ण संघाला पाहण्यासाठी उत्सुक होते. संपूर्ण संघ हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळली. पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

सात वर्षानंतर भारतात

पाकिस्तानी संघ हा तब्बल सात वर्षांनंतर भारतात आला आहे. पाकिस्तान संघ याआधी टी-२० वर्ल्ड कप २०१६ मध्ये भारतात आला होता. त्यानंतर आता तब्बल सात वर्षांनी टीम पाकिस्तान भारतात आली आहे.

पाकिस्तान आणि भारतादरम्यान २०१२ साली एक मालिका झाली होती. मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेले संबंध दुरावले गेले. त्याचा परिणाम क्रिकेटवर झाला.

पाकिस्तानी संघ दुबईमार्गे भारतात

७ वर्षांनी पाकिस्तानी पुरुष क्रिकेट संघ भारतात आला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेशसंघही थेट त्यांच्या देशातून भारतात आले. परंतु पाकिस्तानचा संघ लाहोरवरून दुबईला गेला. त्यानंतर दुबईवरून हैदराबादमध्ये दाखल झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानचे मागील अनेक दशकांपासून कटू संबंध आहेत. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो या कारणावरून भारताने २०१९ मध्ये पाकिस्तानला जाणारी आणि येणारी सर्व विमानं, रेल्वे आणि बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघाला दुबईमार्गे भारतात यावं लागल्याचं कारण समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT