PAKISTAN CRICKET  twitter
Sports

Champions Trophy 2025: 'स्टेडियममध्ये ना धड सीट, ना बाथरुम...' PCB अधिकाऱ्याकडूनच पाकिस्तानची पोलखोल

Mohsin Naqvi On PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोलखोल करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तानला बऱ्याच वर्षांनी आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. येत्या २०२५ मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र पाकिस्तानात जाण्यापूर्वी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

यासह स्टेडियममधील अपोऱ्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी आपल्याच देशातील स्टेडियमची पोलखोल केली आहे.

पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षांपासून कुठल्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील स्टेडियमची परिस्थिती खूप विकट झाली आहे. आंतरराष्ट्रीय सामने सुरु असताना, स्टेडियममध्ये बसण्यासाठी व्यवस्थित सीटही नव्हत्या.

त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली गेली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पाकिस्तानने या स्पर्धेसाठीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

काय म्हणाले मोहसिन नकवी?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नकवी म्हणाले की, ' आपले स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय स्टेडियम यांच्यात जमीन -आस्मानचा फरक आहे. आपलं एकही स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या स्टेडियमच्या आसपासही नाही. आपल्या स्टेडियममध्ये असणारे ना सीट चांगले आहेत, ना बाथरुम. असं एकही दृष्य नाही, जे आपण मैदानातून पाहू शकतो. जर आपल्याला आपले स्टेडियम आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या स्टेडियमसारखं बनवायचं असेल, तर आपल्याला मॉडर्न स्टेडियम बनवावं लागेल.'

टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यावर नकार दिला आहे. भारताने सुरक्षेचा हवाला देत हा निर्णय घेतला आहे.

मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे. यापूर्वी आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानाकडे होते.

दरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आले होते. दरम्यान भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT