Champions Trophy 2025: 'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात नको..' माजी पाकिस्तानी खेळाडूची PCB ला वॉर्निंग, वाचा कारण

Basit Ali On Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCB ला वॉर्निंग दिली आहे.
Champions Trophy 2025: 'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात नको..' माजी पाकिस्तानी खेळाडूची PCB ला वॉर्निंग, वाचा कारण
CHAMPIONS TROPHYyandex
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानला आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. १९९६ वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाहीये, हे जवळजवळ स्पष्ट आहे. त्यामुळे ही स्पर्धा देखील हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Champions Trophy 2025: 'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात नको..' माजी पाकिस्तानी खेळाडूची PCB ला वॉर्निंग, वाचा कारण
Champions Trophy 2025: पाकिस्तानला ICC चा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत घेतला मोठा निर्णय

इंग्लंड, बांगलादेश आणि वेस्टइंडीजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांदरम्यान जर सुरक्षेच्या बाबतीत काही चुका झाल्या, तर पाकिस्तानला आपलं यजमानपद गमवावं लागेल. अशी भिती पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने व्यक्त केली आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना बासित अली म्हणाला की,' चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्टइंडीजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे.

त्यामुळे आम्हाला सुरक्षेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. देव न करो, काही दुर्घटना घडली तर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद जाऊ शकतं. आमचे जवान पेशावर आणि बलूचिस्तानमध्ये शहीद होत आहेत, हे का होतंय याचं उत्तर केवळ सरकार देऊ शकते.'

Champions Trophy 2025: 'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात नको..' माजी पाकिस्तानी खेळाडूची PCB ला वॉर्निंग, वाचा कारण
Champions Trophy 2025: मानलं पाहिजे राव! PCB ला अजूनही वाटतंय टीम इंडिया पाकिस्तानात येणार

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार?

यापूर्वी आशिया चषक २०२४ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यावर स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती.

दरम्यान यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरीदेखील भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजनही हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com