ambani mumbai indians x
Sports

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अंबानींना डिवचलं? मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर केली मोठी कारवाई, काय आहे प्रकरण?

PCB News : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिकन खेळाडू कॉर्बिन बॉशवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कारवाई केली आहे. पीसीबीमध्ये न खेळता आयपीएल २०२५ मध्ये सहभागी झाल्याने पीसीबीने बॉशवर एका वर्षांची बंदी घातली आहे.

Yash Shirke

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने दक्षिण आफ्रिकन खेळाडू कॉर्बिन बॉशवर आयपीएलमध्ये सहभागी झाल्याने एका वर्षाची बंदी घातली आहे. कॉर्बिन बॉश हा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबईच्या संघातील लिजाद विलियम्स हा दक्षिण आफ्रिकन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी कॉर्बिन बॉशला मुंबईकडून संधी देण्यात आली.

कॉर्बिन बॉशने जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या पेशावर जाल्मी फ्रेंचायझीकडून खेळण्यास होकार दिला होता. पण त्याने पीएसएलऐवजी आयपीएलमध्ये सहभागी होणे निवडले. त्यानंतर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पीसीबीने कॉर्बिन बॉशला कायदेशीर नोटीस बजावली. आयपीएलमध्ये पीएसएलपेक्षा जास्त मानधन मिळत असल्याने बॉशने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

२२ मार्च रोजी आयपीएल २०२५ ला सुरुवात झाली. तर ११ एप्रिलपासून पीएसएल २०२५ ला सुरुवात होणार आहे. एकाच वेळी दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पीसीबीने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये कॉर्बिन बॉशवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली असून तो पुढच्या वर्षी होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी पात्र राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणावर बॉशने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'माझ्या निर्णयामुळे मी स्वत: देखील दु:खी आहे. मी पाकिस्तानच्या जनतेची, पेशावर झल्मीच्या चाहत्यांची आणि क्रिकेट प्रेमींची माफी मागतो. भविष्यात पीएसएलमध्ये परतण्याची मला आशा आहे.' पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने माफीनामा न स्वीकारता कॉर्बिन बॉशवर कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT