पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर हत्येच्या कटाचा आरोप; गुन्हा नोंद  Twitter/ @babarazam258
Sports

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर हत्येच्या कटाचा आरोप; गुन्हा नोंद

हमीझा मुख्तारने असा आरोप केला आहे की, बाबर आझमने तिची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.

वृत्तसंस्था

लाहोर: मागच्या काही वर्षात क्रिकेटमध्ये फलंदाजीमुळे चर्चेत आलेला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार (PAK Cricket Team) बाबर आझम (Babar Azam) मोठ्या अडचणीत अडकला आहे. पाकिस्तानमधील ज्या महिलेने बाबर आझमवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते आता तिने बाबरवर आणखी गंभीर आरोप केले आहेत.

हमीझा मुख्तारने असा आरोप केला आहे की, बाबर आझमने तिची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. हमीझा मुख्तारच्या दाव्यानुसार लारोहमधील एका पोलिस ठाण्याबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी तिच्यावर गोळीबार केला. माझा जीव धोक्यात असल्याचही तिने म्हटलं आहे. मला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे असल्याचही तिने सांगितले आहे.

हमीझा मुख्तारने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे सरंक्षण मागितले आहे. दरम्यान, पोलिसांनी हमीझाची तक्रार नोंदवून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हमिजा मुख्तारने जानेवारी २०२१ मध्ये बाबरवर गंभीर आरोप केले होते. यात लैंगिक शोषणाचा केल्याचा देखील समावेश होता.

बाबर आझमने लग्नाचे अमिष दाखवून शोषण केल्याचा आरोपही हमिझा मुख्तारने केला होता. इतक नव्हे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझमने आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडले होते, असे हमिजाने म्हटले होते. यासाठी तिने गर्भपात केल्याचे सबळ पुरावे सादर केले होेते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT