babar azam twitter
क्रीडा

Babar Azam Statement: इंग्लंडकडून पराभूत होताच बाबर आझम भडकला! या खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडत म्हणाला,'आम्ही जर..'

Pakistan vs England: या सामन्यात पराभूत होताच बाबर आझमने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Babar Azam On Defeat Against England:

पाकिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यातही पाकिस्तानला ९३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या विजयानंतर इंग्लंडचा संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर पाकिस्तानचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून पॅकअप झाला आहे. दरम्यान या सामन्यानंतर बाबर आझमने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझम निराश झाल्यानंतर पाहायला मिळाले आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना तो म्हणाला की,' या पराभवानंतरमी खूप निराश झालो आहे. जर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला असता तर आज गोष्ट चित्र काहीतरी वेगळं असतं. आम्ही गोलंदाजीत खूप चुका केल्या. आम्ही गोलंदाजीसह फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणातही हवी तशी कामगिरी करु शकलो नाही. या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी २० ते ३० अतिरिक्त धावा दिल्या. आमच्या गोलंदाजीत ती धार नव्हती. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज धावा काढल्या.' (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की,' आमचे फिरकी गोलंदाज या सामन्यात विकेट्स घेऊ शकले नाही. याच गोष्टीचा फरक आमच्या संघावर पडला. जर संघातील गोलंदाज मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढत नसतील, तर या गोष्टीचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो.'

' आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करु. आम्ही सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करु. आम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यातून शिकून आम्ही पुढे जाऊ.' असं बाबर आझम म्हणाला. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानला हवी तशी कमागिरी करता आली नाही. ९ पैकी ४ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवता आला. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

SCROLL FOR NEXT